अमरावती जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता

अमरावती :- काही दिवसाआधी कोरोना रुग्णाच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. मात्र कोरोनाचे (Corona) संकट अद्यापही कायम आहे. राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. अमरावतीमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. जर रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली, तर लॉकडाऊन (Lockdown)लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१ फेब्रुवारीपासून अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ४३२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ३६९ तर शनिवारी ३७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत संचारबंदीचे आदेश काढले आहे. तसेच जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस व कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश दिले आहे. गर्दीच्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास व कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

शहरातील मार्केट, बाजारपेठा दुकाने व जीवनावश्यक वस्तूंना सूट दिलेली आहे. तसेच शासनाच्या नियामवलीचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव गांभीर्याने घेतला नाही, तर आगामी काळात लॉकडाऊनचा सामना करावा लागेल, असे शैलेश नवाल यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER