साताऱ्यासह महाबळेश्वर येथे गारपिटीची शक्यता; सांगली, कोल्हापूरसाठी ‘हाय अलर्ट’

Rain

सातारा : गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यासह राज्यात बऱ्याच ठिकाणी अकाली पाऊस सुरू आहे. आणखी काही दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाची स्थिती राहणार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात विविध ठिकाणी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला आहे. आज सातारा आणि महाबळेश्वर येथे वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांनादेखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या सातारा, महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणात ढग दाटले आहेत. पुढील काही तासांतच सातारा आणि महाबळेश्वरसह कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता आहे, असे मुंबई वेधशाळेने म्हटले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि महाबळेश्वर या भागांत राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटक राज्यात चक्रीवाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील तीन दिवस (७ मेपर्यंत) राज्यात अकाळी पावसाची स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील एक आठवडा पुण्यातील हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button