खंडित वीज पुरवठ्यामागे घातपाताची शक्यता – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

Nitin Raut

मुंबई :  मुंबई (Mumbai) व ठाणे (Thane) येथे सोमवारी वीज पुरवठा होण्यामागे खंडित घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज दिली. कळवा पडघे ४०० के व्ही वीज वाहिनीत १२ ऑक्टोबर रोजी अचानक तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होऊन मुंबई व त्याच्या आजूबाजूच्या उपनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याने जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई शहर अंधारात जाणे ही साधीसुधी घटना नाही. यापूर्वी २०११ मध्ये अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित झाला होता. यावर एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर करून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काही उपाययोजना सुचविलेल्या होत्या. त्यावर अंमलबजावणी झाली किंवा नाही हे तपासून बघण्यात येणार आहे.  यासाठी कृती अहवाल (एटीआर) मागवला आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. या घटनेची चौकशी करताना सर्व तांत्रिक बाबी तपासून घेण्यात येणार असून वीज सुरक्षा साधनांची व उपाय योजनांचे ऑडिट करण्यात येणार आहे. लवकरच यावर अहवाल सादर करण्यात येणार आहे.

काही लोक ऊर्जा खात्याला बदनाम करायचं काम करत आहेत. मुंबई व त्याच्या आजूबाजूच्या उपनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याने जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे केंद्र सरकारनेसुद्धा यावर एक समिती नेमली आहे. ही समिती  सध्या मुंबईच्या भेटीवर असून वीज पुरवठा ठप्प होण्यामागील कारणांचा शोध घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात, देशात व जगात तांत्रिक कारणाने वीज यंत्रणेत बिघाड होऊन विद्युत पुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. याला कोणताही पक्ष, सरकार वा देशही अपवाद नाही.

तांत्रिक बिघाड होऊन मुंबई व ठाण्यात साधारणतः चार ते पाच तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भाजपने याचा राजकीय फायदा उचलण्याचा कुत्सित प्रकार केलेला आहे. भोपाळमध्येही मुंबईच्या आदल्या दिवशी ११ ऑक्टोबरला सहा तास वीज नव्हती. तेव्हा मात्र भाजपने मौन का साधले? भोपाळमध्ये घडलेला हा प्रकार म्हणजे मध्यप्रदेशातील भाजप सरकारचे अपयश म्हणायचे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER