राज्य मंत्रिमंडळात खांदेपालटाची शक्यता, देशमुखांचे गृहमंत्रीपद जाणार?

Maharashtra Today

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या गंभीर स्वरुपाच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना क्लीन चिट देत राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल (Reshuffle in the state cabinet) केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, मागील काही दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून डॅमेज कंट्रोलसाठी मंत्रिमंडळात खांदेपालट केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडील गृहमंत्रिपद काढून दुसऱ्या खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. देशमुखांवरील आरोपांमुळे हे फेरबदल होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल दुजोरा मिळालेला नाही.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांचा मोठा निर्णय; अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार नसल्याचे केले स्पष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER