मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता, शरद पवार आणि प्रफुल पटेलांची अमित शहांसोबत गुप्त भेट

Maharashtra Today

मुंबई : सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकारची कोंडी होताना दिसत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात ‘ठाकरे’ सरकार (Thackeray Govt) अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यामुळे सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार आहे. आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि जेष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful patel) यांनी भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत गुप्त भेट घेतल्याची माहिती पुढे येत आहे. (Sharad-pawar-and-praful-patels-secret-meeting-with-amit-shah)त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचीही शक्यता नाकारता येत नाही.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याची माहिती आहे. अहमदाबादच्या फार्महाऊसवर ही भेट झाली. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहमदाबादमधील फार्महाऊसवर २६ मार्चच्या रात्री ९.३० वाजता ही भेट झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यावेळी अहमदाबादेतच होते. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नाही.

दुसरीकडे, शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. शांतिग्राममधील गेस्टहाऊसला पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूनीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप तर होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button