पोर्तुगालची प्रियसी दिल्लीच्या मुघल दरबारात ठरली होती किंगमेकर!

Maharashtra Today

मुघल बादशाह औरंगजेबच्या( Mughal court) शासन काळात एका पोर्तुगालच्या महिलेचा उल्लेख होतो. जिला मुघल दरबारात मोठं स्थान होतं. मुघलांच्या प्रशासनात तिला मोठे अधिका होते. मुघलांचं समर्थन मिळवून ख्रिश्चन धर्मियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तिनं पार पाडली. यासोबतच भारतात पोर्तुगीज आणि डचांच्या सहकार्यासाठी काम करत तहोती. यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेबाच्या मरणानंतर सत्तेसाठी लढणाऱ्या राजपुत्रांपैकी बाहदुरशाह प्रथमला गादी मिळवून देण्यासाठी तिनं मोठी भुमिका पार पाडली होती.

तिचं नाव होतं जलियाना (Jalliana). इतिहासकारांच्या मते जुलियाना आणि बहादूरशहा यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते.

औरंगजेबच्या दरबारात मिळवलं स्थान

इतिहासकारांच्या मते जुलियाचा जन्म १६४५ मध्ये आग्र्यात झाला. तिच्या वडीलांचा नाव होतं. ‘ऑगोस्टिन्हो डियास डा कोस्टा.’ मुघल दरबारात वैद्यकीय तज्ञ म्हणून ते कार्यरत होते. त्यांच कुटुंब कोचीनहून दिल्लीला स्थलांतरीत झालं होतं. एक गुलाम म्हणून मुघल दरबारात आणल्याच्या नोंदी आहेत. यावर अनेक इतिहासकारांच्यात मतभेद आहेत.

तर इतरांच्या मते पोर्तुगाली डाकूंनी मुघल दरबारातील दासींच अपहरण केलं होतं. त्यांनी दिल्लीच्या आसपासच्या इलाक्यात जबर लुटपाट केली होती. तेव्हा शहाजहॉंनने १६३२ मध्ये हुगळी नदीजवळील पोर्तुगीजांच्या छावणीवर आक्रमण केलं. यावेळी अनेक पोर्तुगीजांना बंदी बनवून आग्र्यात आणण्यात आलं होतं. त्यापैकीच एक होतं जुलीयाचं परिवार.

युरोपीय लोकांना असणाऱ्या वैद्यकीय ज्ञानाची मुघलांना खबर होती. युरोपीयांच्या वैद्यकीय उपचार पद्धतीमुळं मुघल प्रभावीत होते. त्यामुळं जुलियानाच्या वडीलांना मुघल दरबारात काम करण्याची संथी मिळाली. लहान वयात जुलियाचं लग्न झालं परंतू तिच्या पतीचा देहांत झाला. तेव्हा जुलिया परत तिच्या वडीलांकडे आली. वडीलांच्या मदतीनं तिने दिल्ली दरबारात आपलं स्थान पक्क केलं.

शेहजाद्याच्या प्रेमात

मुघल दरबारात जुलियानाला औरंगजेबच्या पत्नीची दासी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जी शेहजादा मुअज्जम म्हणजे बहादुरशहा प्रथमची आई होती. जुलियानानं मुघल दरबारात नाव कमावलं आणि मुघल बादशाहच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक बनली. नंतर औरंगजेबने तिची नियुक्ती शेहजादा बहादुरशहाची शिक्षिका म्हणून केली. जुलियानानं हे खुप कमी वयात करुन दाखवलं त्यावेळी तिच वय होतं मात्र १८ वर्ष आणि बहादुरशहा जाफर ही याच वयाचा होता. जुलियाना खुपच सुंदर होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

तुरुंगवास भोगण्याची तयारी

१६८७ ला औरंगजेबनं पत्नी नवाब बाई आणि मुलगा बहादुरशहा यांच्यावर नाराज होऊन त्यांना कैदेत टाकलं. अशात जुलियानं प्रेम खरं असल्याचं सिद्ध करत तिही शेहजाद्यासोबत तुरुंगात गेली. १८९१ मध्ये नवाब बाईचा मृत्यू झाला. नंतर १९९३ ला बहादुरशहाला तुरुंगातून सोडवण्यात आलं. यात महत्त्वाची भूमिका जुलियानाबाईची होती.

सुटका झाल्यानंतर बहादुरशहाला काबुलचा सुभेदार नेमण्यात आलं. त्यानं पेशावर, जललबाद आणि जगदलक जिंकलं. १६९९ मध्ये काबूल सत्ता ताब्यात घेतली आणि तिथं अधिकार प्रस्थापित केले. औरंगजेबच्या मृत्यूपर्यंत बहादूरशहा काबूलचं सुभेदारपद सांभाळत होते. बहादूरशहाच्या या कामात जुलियानं मोठी भूमिका पार पाडली. तिनं पोर्तिगीजी सैन्यातील तोफखान्याली व्यक्तींना मदतीला बोलावलं त्यांच्या जीवावर बहादूरशहानं अनेक युद्ध जिंकली.

बहादुरशहाला बनवलं दिल्लीचा सुल्तान

१७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये सत्ता संघर्ष झाला. बहादुरशहा विरुद्ध त्यांच्या भावांमध्ये याच वर्षी ‘जजाऊ’ युद्ध झालं. या युद्धात जुलियानानं बहादुरशहाला रणांगणात साथ दिली. पोर्तिगीजांच्या सैन्याचे समर्थन या युद्धासाठी मिळवण्यात जुलियानानं प्रयत्न केले होते. या युद्धात बहादुरशहाचा विजय झाला. तो बादशाह झाला यात सिंहाचा वाटा जुलियानाचा आणि तिच्या राजकीय समजेचा होता.

अखेपर्यंत निभावली साथ

युद्ध जिंकल्यानंतर शेहजाजा मुअज्जम दिल्लीचा सुल्तान झाला. त्यांने जुलियानाला ख्रिश्चन धर्मियांची संरक्षक घोषित केलं. त्याच्या शासन काळात ख्रिश्चनांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. पुढं जिजिया करातून ख्रिश्चनांना सुट देण्यात आली या जुलियानाचे योगदान होते. पुढं १७११ ला बहादुरशाह प्रथमचा मृत्यू झाला. शेहजाद्याची शिक्षका ते दिल्लीचा बादशाह ठरवणारी स्त्री अशी इतिहासानं जुलियाची नोंद घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button