मिर्‍या किनारी अडकलेले बसरा स्टार जहाज लवकरात लवकर हलवण्याची बंदर विभागाची मालकांना सूचना

रत्नागिरी/प्रतिनिधी: मिर्‍या किनारी अडकलेल्या बसरा स्टार जहाजाच्या पुढे संकटांची मालिका वाढत चालली असून आता हे जहाज लवकरात लवकर हलवण्याची सूचना बंदर विभागाने जहाज मालकांना केली आहे.

निसर्ग चक्रीवादळात मिऱ्या किनार्‍यावर अडकलेल्या बसरा स्टार जहाजापुढची संकटांचीमालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण आले आहे. त्यामुळे उसळणाऱ्या जोरदार लाटांच्या तडाख्याने जहाज खडकावर आदळून सुमारे २० टक्केहून अधिक जहाज नादुरूस्त झाले आहे. जहाजाच्या तळातून पाणी आत येत असल्याने धोका अधिक वाढला आहे. जहाज दुरूस्तीसह बाहेर काढण्यासाठी कोट्यावधींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे जहाज मालकही अडचणीत सापडले आहेत. तर दुसरीकडे स्थानिकांनी जहाज लवकर हटविण्याची मागणी केली आहे. बंदर विभागाने जहाज मालकांना नोटीस बजावली असून जहाज केव्हा किनार्‍यावरून काढणार याची माहिती देण्याची सूचना केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER