‘आज तक’चे लोकप्रिय वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन

Maharashtra Today

नवी दिल्ली : ‘आज तक’ (Aaj Tak) या हिंदी वृत्तवाहिनीचे लोकप्रिय वृत्तनिवेदक रोहित सरदाना (Rohit Sardana) यांचं काही वेळापूर्वीच निधन झालं आहे. रोहित यांना कोरोनाची (Corona positive)बाधा झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी तसंच झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करुन ही धक्कादायक माहिती दिली.

रोहित सरदाना हे झी न्यूजमधून आज तकमध्ये आले होते. मितभाषी आणि संयमी न्यूज अँकर म्हणून ते परिचीत होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सुधीर चौधरी हे ट्विटमध्ये म्हणतात, ‘आताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून हात थरथर कापू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदानाच्या मृत्यूची ती बातमी होती. हा व्हायरस आमच्या इतक्या जवळच्या कोणाला घेऊन जाईल याची अजिबात कल्पना नव्हती. हा देवाचा अन्याय आहे, ओम शांती’

दुसर्‍या ट्वीटमध्ये रोहित सरदानांच्या आठवणींना उजाळा देत राजदीप सरदेसाई यांनी लिहिले की, ‘रोहित आणि माझ्यात राजकीय मतभेद होते, परंतु आम्ही नेहमीच चर्चेचा आनंद घेत असो. आम्ही रात्री एक कार्यक्रम केला, तो मध्यरात्री ३ वाजता संपला. कार्यक्रम संपताच तो म्हणाला “बॉस मजा आ गया”. तो एक वेड लावणारा अँकर पत्रकार होता. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, रोहित सरदाना.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button