पूनम पांडेला ठार मारण्याची धमकी आणि मारहाण; पती सॅम बॉम्बेला अटक

Poonam Pandey - Sam Bombay

अभिनेत्री पूनम पांडेला (Poonam Pandey) ठार मारण्याची धमकी देणे, तिला मारहाण करणे आणि विनयभंग करणे या आरोपात तिचा नवरा सॅम बॉम्बेला (Sam Bombay) गोवा पोलिसांनी (Goa Police) अटक केली.

सॅम बॉम्बेने मला ठार मारण्याची धमकी दिली, मारहाण केली असा आरोप पूनमने केला, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अक्षीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली. गोव्यातील काणकोण पोलिसांनी ही कारवाई केली.

पूनम आणि सांचे १२ सप्टेंबरला लग्न झाले. पूनमने लग्न झाल्याची माहिती लग्नाचे फोटो पोस्ट करुन दिली होती. चार दिवसांपूर्वीच ‘हॅविंग बेस्ट हनीमून’ म्हणत एक व्हीडीओही पोस्ट केला होता.

पूनम पांडे एका चित्रीकरणासाठी दक्षिण गोव्यातील काणकोण येथे आली आहे. तिच्यासोबत पती सॅम बॉम्बेही आला आहे. पूनम पांडेने सॅम बॉम्बे विरोधात विनयभंग, ठार मारण्याची धमकी आणि मारहाण केल्याची तक्रार पोलिसात केली आहे.

View this post on Instagram

Having the best honeymoon 🙂

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER