पूनम पांडेने केली पतिविरोधात मारहाणीची तक्रार

Poonam Pande

सेक्सी फोटोशूटसाठी प्रख्यात असलेल्या अभिनेत्री पूनम पांडेचे (Poonam Pandey) लग्न दहा दिवसही टिकलेले नाही. पूनम पांडेने आपल्या पतिविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार केली असून पोलिसांनी तिच्या पतिला अटक केली आहे. 10 सप्टेंबर रोजीच पूनमने तिचा बॉयफ्रेंड सॅमसोबत गपचुप लग्न केले होते. पूनमने सोशल मीडियावर तिच्या लग्नाची घोषणा करीत दोघांचे फोटो शेअर केले होते. लग्नानंतर दोघेही हनीमूनसाठी गोव्याला गेले होते.

हनीमूूनसोबतच पूनम गोव्यात एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भाग घेणार होती. पूनमने सोमवारी पोलिसांकडे तक्रार करीत सॅमवर घरगुती हिंसाचाराचे अनेक आरोप लावले आहेत. पूनमने तक्रारीत म्हटले आहे दक्षिण गोव्यातील कानाकोना गावात शूटिंग करीत होती. सोमवारी रात्री माझ्या पतिने मला मारले आणि मॉलेस्ट केले. एवढेच नव्हे तर त्याचे ऐकले नाही तर मुंबईत गेल्यावर याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून सॅमला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सॅमची आता मेडिकल टेस्ट केली जाणार असून त्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले जाणार आहे.

सॅम बॉम्बेचा जन्म दुबईत झाला असून तो एक अॅड फिल्म मेकर आहे. त्याने आतापर्यंत अक्षय कुमार, रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, जॅकलीन फर्नांडिस, तमन्ना भाटिया, अल्लू अर्जुन, विराट कोहली, युवराज सिंह आणि अन्य अनेक मोठ्या कलाकारांबरोबर प्रोजेक्ट केलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER