अश्लील व्हीडियो तयार केल्याबद्दल पूनम पांडेवर गुन्हा दाखल

Poonam Pandey

सतत चर्चेत आणि नेहमी वाद निर्माण करणारी बिनधास्त अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) पुन्हा एकदा वादात सापडली आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला विंगने पूनम पांडेविरोधात एफआईआर (FIR) दाखल केला आहे. पूनमने चपोली डॅम येथे एक अश्लील व्हिडियो ( pornographic videos) चित्रित केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. खरे तर पूनम पांडे गोव्यात शूटिंग करून नुकतीच मुंबईला परतली आहे. ती मुंबईला परतल्यानंतर तिच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पूनमने यापूर्वी सचिनसोबत स्वतःचा न्यूड फोटो व्हायरल केला होता. तसेच भारताने क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला तर मी न्यूड होईऩ असेही तिने म्हटले होते. याशिवाय शिल्पा शेट्टीचा पति राज कुंद्राने तिचा खाजगी मोबाईल नंबर सार्वजनिक केल्याची तक्रार करीत तिने राज कुंद्रालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आणि आता अश्लील व्हिडियो तयार करण्याचे प्रकरण समोर आले आहे.

गोव्याच्या कनाकोना पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अज्ञात व्यक्तीने पूनम पांडेसोबत मिळून अश्लील व्हिडियो तयार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच पूनम पांडेने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेबरोबर लग्न करून हनीमूनला गेली होती. परंतु तेथे गेल्यानंतर तिने पतिविरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल करून खळबळ माजवली होती. पोलिसांनी तिच्या पतीला अटकही केली होती. परंतु दोन दिवसातच तिने पतीबरोबर पॅचअप केले आणि पुन्हा दोघे एकत्र आले होते. या प्रकरणानंतर पूनम पुन्हा गोव्याला शूटिंगसाठी गेली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER