अश्लील व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी पूनम पांडे अटकेत

Poonam Pandey

आम्ही तुम्हाला कालच बातमी दिली होती की, विवादास्पद अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) विरोधात गोव्यात अश्लील व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच तक्रारीवरून पूनम पांडेला गुुरुवारी गोवा पोलिसांनी अटक केली.

गोव्याच्या कानाकोन बीचवर पूनमने एक अत्यंत अश्लील व्हिडीओ शूट केला होता. त्याविरोधात गोवा फॉरवर्ड पार्टीने तक्रार दाखल करीत सरकारच्या मालमत्तेत व्हिडीओ शूट केल्याचे म्हटले होते. बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. पूनम पांडेने या व्हिडीओचा एक टीजर तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर अपलोड केला होता. काही मिनिटांतच तो टीजर जगभरात व्हायरल झाला होता. त्यामुळेच तक्रारीत असेही म्हणण्यात आले होते की, पूनम पांडे अश्लील व्हिडीओ तयार करून पैसे कमवते. गोवा पोलिसांनी याची गंभीर दखल घेत गुरुवारी पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER