माझी बहीण वाघीण होती; पूजाच्या बहिणीची भावूक पोस्ट

Diya chavan-Pooja Chavan

बीड : माझी बहीण वाघीण होती. पूजाने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामागे कुठले तरी मोठे कारण असेल, असे म्हणून पूजेला न्याय मिळवून देण्यासाठी तिची बहीण दिया सरसावली आहे.

खळबळजनक पूजा चव्हाण ( Pooja Chavan)आत्महत्या प्रकरणात आधी कथित मंत्री आणि कार्यकर्त्याच्या संभाषणाच्या क्लिप ( Audio Clip ) बाहेर आल्या. आता तिची बहिण दिया चव्हाण (Diya Chavan) हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट (emotional post)टाकली आहे – माझी बहिण वाघीण होती. ती असे करु शकत नाही. तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठले तरी मोठे कारण असेल.

दिया म्हणाली, २ दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काहीही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता. ती फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की असे काही करेल. तुम्हालापण हे चांगले माहीत आहे. मझा आजही विश्वास बसत नाही की, नाही तिने सुसाईड केले आहे. केले असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेल. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे. ती आज आपल्या सोबत नाही याचे तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी – पप्पाला सांभाळायचे आहे. तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळवून देऊ शकत नसाल तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या. ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Diya Chavan (@the_diya_chavan1)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER