पूजाला एकही भाऊ नाही , कुटुंब अजूनही शांत कसं ;आजी शांताबाईंनी केला सवाल

Santabai Rathore-Pooja Chavan

बीड : टिक टॉक स्टार, एक सामाजिक कार्यकर्ती पुजा चव्हाण (Pooja Chavan) या २२ वर्षीय तरूणीने आत्महत्या करून आज आठवडा झाला. मात्र अजूनही पूजाच्या कुटुंबीयांकडून या प्रकरणी काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. कुटुंबाने अजूनही या प्रकरमात आपले मौन धारण केलेले आहे. तिच्या कुटुंबीयांच्या या मौनावर पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड (Shantabai Rathore)यांनीच काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

पूजा आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हती. ती अत्यंत डॅशिंग, मुलांसारखं काम करणारी मुलगी होती. घरातील कर्तव्य पार पाडायची. तिने आत्महत्या केली यावर विश्वास बसत नाही. पण तिचे आईवडील गप्प का आहेत हाच गंभीर प्रश्न आहे, असा प्रश्न पुजाच्या आजीने उपस्थित केला आहे.

तसेच, दारावती तांड्याचा अरुण राठोड पुण्याला पोहोचला कसा? हे माहीत नाही. तो पूजाचा कोणीच नाही. तो पूजाचा भाऊ नाही. पूजाला एकही भाऊ नाही. त्या सहा बहिणी आहेत. त्यात पूजा पाचवी आहे. इतर चौघींची लग्नं झालेली आहेत. अरुणसह त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पूजा आत्महत्या प्रकरणाला कोणीही जबाबदार असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो बंजारा समाजातील असो की इतर कोणत्याही समाजातील असो दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. पूजाला न्याय मिळालाच पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, पूजाच्या अंत्यविधीला आम्ही गेलो होतो. तिच्या अंत्यविधीला तिच्या घरातील मुख्य माणसे नव्हती. आम्हीच खेड्यापाड्यातील लोक होतो, असंही त्या म्हणाल्या. पूजा माझ्याशी नेहमी बोलायची. ती राजकारणात सक्रिय होती. पण तिला राजकारण आवडत नव्हते. तिला आयुष्यात खूप पुढे जायचं होतं. तसं ती सांगायचीही, असंही शांताबाई यांनी टीव्ही९ मराठीशी बोलताना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER