पूजाच्या डोक्याला झाली होती गंभीर जखम; पोस्टमॉर्टम रिपोर्ट

Pooja Chavan

मुंबई : पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर अख्ख राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात भाजपाकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे. या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathore)यांचे नाव पूजा चव्हाणशी (Pooja Chavan) जोडले आहे. यावर विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. पूजा चव्हाण हिचा मृत्यू कसा झाला? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. माहितीनुसार ती ड्रिंक करून बाल्कनीत बसली होती, त्यात तिचा पाय घसरून मृत्यू झाला. तर काहींनी आत्महत्या केल्याचा दावा केला.

अशातच पूजा चव्हाण हिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला. रिपोर्टनुसार पूजाच्या डोक्याला व मनक्याला मार लागल्याचा उल्लेख आहे. मात्र, हा अपघात आहे की आत्महत्या… याचा अद्यापही खुलासा झालेला नाही. तर या प्रकरणात महिला आयोगाने चौकशी करण्याची मागणी केली आहे. आयोगाकडून राज्य सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस देण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनीही पुणे पोलिसांकडूनही माहिती घेतली आहे. पोलीस या प्रकरणाबाबत गंभीर दखल घेणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. दुसरीकडे पूजाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्याने अधिक तपास केला जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER