मुंडेंना पवारांनी वाचवलं, राठोडांना ठाकरे वाचवतील ; राठोडांच्या अटकेसाठी भाजप आक्रमक

pooja chavhan case-Munde was saved by Pawar-Rathore will be saved by Thackeray-BJP aggressive

मुंबई :  पुजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरण रोज नवनवे वळण घेत आहे. आज या प्रकरणात सर्वात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) थेट राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर, दुसरीकडे हे प्रकरण समोर आल्यापासूनच भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या नेत्यांनी पहिल्या दिवसापासूनच शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव घऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता तर भाजपचे नेते किरीट सोमय्या अधिकच आक्रमक झाले असून, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या तीन बायका आहेत, तरी शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना वाचवलं, आता संजय राठोडांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वाचवत आहेत. असा घणाघात केला आहे.

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी, हा प्रश्न आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा नाही, तर त्यांची हकालपट्टी व्हायला हवी होती. राठोडांना ताबडतोब अटक करायला हवी होती. धनंजय मुंडेंना तीन-तीन बायका, त्यांना शरद पवार वाचवतात. संजय राठोड यांनी 22 वर्षांच्या तरुणीच्या आयुष्याचा सत्यानाश केला आहे, त्यांना उद्धव ठाकरे वाचवतात, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

ही बातमी पण वाचा : पूजाच्या वडिलांची प्रतिक्रिया अतिशय दुर्दैवी, तो आवाज संजय राठोड यांचाच; चित्रा वाघ आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER