पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी उलगडा होईपर्यंत चौकशी होईल; पुणे पोलिसांची भूमिका

Pooja Chavhan-Maharashtra Police

पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवतांना कायदेशीर अडचणी आल्याने गुन्हा नोंद केला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात पुणे पोलिसांवर टीका होत होती. या प्रकरणात मंत्र्याचा हात असल्यामुळे तपास केला जात नसल्याचा आरोप भाजप (BJP) नेते करत होते. या प्रकरणात तपास सुरू असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

पूजा चव्हाण हिचा बाल्कनीमधून पडून मृत्यू झाला आहे. पूजाचे कॉल रिकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागल्यानंतर महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप भाजप नेते करत होते. पोलिसही दबावामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेत नव्हते. पूजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये धक्कादायक बाबी आहेत, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “ऑडिओ क्लिप्स हा गुन्हा नोंद करण्याचा आधार होऊ शकत नाही. पूजाच्या कुटुंबीयांनी तक्रार द्यायला नकार दिला. काही तांत्रिक अडचणींमुळे गुन्हा नोंदवता येत नव्हता. पूजा इमारतीवरून पडली त्यावेळी तिचा चुलत भाऊ आणि मित्र सोबत होता. पूजा ही इंग्लिश स्पिकिंग क्लास करायला पुण्यात आलेली होती. पुण्यात ती भाड्याने राहत होती. तपासादरम्यान घरात मद्याच्या ४ बाटल्यांपैकी अडीच बाटल्या खाली होत्या. यावरून तीने जास्त ड्रिंक केल्याचे स्पष्ट होते. गुन्हा नोंद नसल्याने फक्त जबाब घेता आले. यावरून कोणालाही अटक करण्यात आले नाही.” असेही त्यांनी स्पष्ट केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड म्हणाले की, “पूजाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. तसेच तिच्या सोबत असलेल्या चुलत भावाचे आणि मित्राचे जबाबही घेतले आहेत. या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होईपर्यंत तपास करण्यात येईल.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER