संजय राठोड यांची उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली ; अवघ्या काही तासांत पडणार ‘विकेट’

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणामुळे शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत .संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेटीसाठी वेळ मागितली होती; पण त्यांनी ती नाकारली आहे. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही भेट नाकारली आहे. त्यामुळे संजय राठोड यांना आता राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले आहे.

पुढील काही तासांतच संजय राठोड वनमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्विट करून संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार असे संकेत दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER