पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी धमकी : अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी (Pooja Chavan suicide case) राज्यातील राजकारण सध्या गोंधळाच्या स्थितीत आहे. वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पूजा चव्हाण आत्महत्येला जबाबदार धरले आहे. सध्या विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या नावाचा थेट उल्लेख करून मविआ सरकारला धारेवर धरले. याप्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही आवाज उठवला.

या आत्महत्याप्रकरणातील चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्र पाठवले होते. ठाकरे सरकारवर आता भातखळकर यांनी ट्विट करून आरोप केले आहेत. भातखळकर म्हणाले की, “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे कालपासून धमक्यांचे फोन येत आहेत, ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे.धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER