पूजाची आजी करणार संजय राठोड यांची तक्रार!

पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chavan Case) मृत्यूची नवीन माहिती समोर आली आहे. माहितीनुसार पूजाची आजी शांताबाई राठोड (Shantabai Rathod) या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांच्या मदतीने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. तिची आजी पुणे पोलीस आयुक्तांशी भेटणार. शांताबाई राठोड यांच्या फिर्यादीमध्ये वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचे नाव घेणार आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले. राठोड यांच्या राजीनाम्यावर विरोधक अडून बसले आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरसुद्धा पूजाच्या मृत्यूप्रकरणाचे सावट आल्याचे दिसत आहे. राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांचा राजीनामा घेणार, असे बोलत आहेत. यापूर्वी पूजाच्या मृत्यूप्रकरणात भाजपाने पुण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात आता पूजाची आजी मृत्यूबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी समोर आल्या आहेत. त्या पुणे पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहेत. पूजाच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून निघणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या फिर्यादीमध्ये संजय राठोड यांचेही नाव टाकणार आहेत. त्यामुळे राठोड अडचणीत आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या मदतीने त्या पोलिसांत तक्रार दाखल करतील.

आमदारकी आणि मंत्रिपदाचाही राजीनामा देणार?

दरम्यान, राठोड हे आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा देणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राठोड पुन्हा निवडणुकीला सामोरे जातील. त्यातून जनता आणि समाज आपल्याच पाठिशी असल्याचेही दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्गही मोकळा होणार, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER