पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण : चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Chandrakant Patil - uddhav Thackeray

मुंबई : सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणावर अनेक मंत्री प्रतिक्रिया देत आहेत. या आत्महत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जात आहे. या प्रकरणामागे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मंत्री असल्याचे सांगितले जात आहे. नक्की हा मंत्री कोण आहे, याचा उलगडा अजूनदेखील झाला नव्हता. यात भाजपाने शिवसेना (Shivsena) नेते संजय राठोड (Sanjay Rathore) यांचे नाव घेतले आहे. राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, “पोलिसांनी आतापर्यंत ज्या ऑडिओ क्लिप्स बाहेर आणल्या आहेत, त्याची सखोल चौकशी करावी. तसेच पोलिसांनी अजूनही पूजा चव्हाणचा लॅपटॉप चेक केलेला नाही. त्याची तपासणी केल्यास बरीच माहिती समोर येईल, असा दावा पाटील यांनी केला आहे. तसेच ठाकरे सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, “पूजा चव्हाण प्रकरणातही जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी (Uddhav Thackeray) कारवाई केली नाही, तर महिलांचा राज्य सरकारवरचा विश्वास उडेल.” सरकारने पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी ट्विट केले आहे.

तत्पूर्वी, भाजपच्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर केला आहे. यात पूजा चव्हाण प्रकरणात समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता, याचा थेट संबंध शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो, असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER