महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री ठाकरे बोलणार नाहीत : आशिष शेलार

मुंबई : राजकीय वर्तुळात पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणाचे पडसाद उमटत असताना संजय राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनावरून राजकारण पेटले आहे. यावरून भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला .

कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करू, पण गर्दी जमवणाऱ्या एका ‘गबरू’वर कारवाई नाही, असा टोला लगावत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करू, पण गर्दी जमवणाऱ्या एका ‘गबरू’वर कारवाई नाही. एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला; पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरू आहे… तो मी नव्हेच- अशी टीका शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही. एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे… तो मी नव्हेच, अशी टीका शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER