पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण : अरुण राठोड कुटुंबीयांसोबत झाला गायब

पुणे : परळीच्या पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पेटले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात आल्यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला असून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सध्या तरी यासंदर्भात कुठलीही लक्षणं दिसत नसली तरी या प्रकरणातील अरुण राठोड (Arun Rathod) गायब झाल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संशयित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यात झालेला संवाद व्हायरल झाले आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये दोघांच्या संवादाची जोरदार चर्चा रंगली असून विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे; पण या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या अरुण राठोडचा आवाज आहे तो अरुण राठोड हा पूजा चव्हाण हिच्या भावांसोबत एकाच घरात राहात होता. न्यूज- १८ लोकमतची टीम अरुणच्या घरी पोहचली तेव्हा घराला कुलूप होते.

संपूर्ण कुटुंब हे गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तसा अरुण राठोड हा आपल्या कुटुंबासोबत गायब आहे. अरुण राठोड हा या प्रकरणातील महत्त्वाचा धागा असल्याने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याचे अरुण राठोड याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER