
मुंबई : पूजा चव्हाण बद्दल आवाज उचलल्यावर धमकीचे फोन येत आहेत आमच्या सहकाऱ्यांना.. एखादा कॉल मला ही टाका ना.. मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे.. वाट बघतो आहे. असे ट्विट आता भाजप नेते नितेश राणे यांनी केले आहे.
पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या विदर्भातील मंत्र्यांचे थेट नाव घेऊन आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तर, भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनीही या प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचे नाव घेत शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
त्यानंतर आता भाजपच्या या दोन्ही नेत्यांना धमकीचे फोन येत असल्याचे सांगितले आहे.
भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत(Pooja Chavan Suicide Case) आवाज उठवल्यामुळे रविवारपासून मला धमक्यांचे फोन येतायेत, ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे असा आरोप त्यांनी केला.
पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे.
धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @OfficeofUT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2021
त्यानंतर आता नितेश राणे ांनी ट्विट करून शिवसेनेवर प्रहार केला आहे. एखादा कॉल मला ही टाका मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे.. वाट बघतो आहे असे ट्विट राणेंनी केले आहे.
पूजा चव्हाण बद्दल आवाज उचल्यावर धमकीचे फोन येत आहेत आमच्या सहकाऱ्यांना..
एखादा कॉल मला ही टाका ना..
मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे..
वाट बघतो आहे !!! 😊😊— nitesh rane (@NiteshNRane) February 15, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला