
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan sucide case) चर्चेत असलेले शिवसेना (Shivsena) नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) अजूनही नॉट रिचेबल आहेत. या आत्महत्येला आठवडा उलटून गेला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले. राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यातच प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. प्रकरण समोर आल्यापासून ते कुठेही दिसलेले नाहीत. बंजारा समाजानेही संजय राठोड यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले आहे. संजय राठोड कधी समोर येणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बंजारा समाजाकडून राठोडांना पाठिंबा
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांचे नाव गोवले जात आहे. यामुळे बंजारा समाजाची मोठी बदनामी सुरू आहे. ही बदनामी थांबवावी, अशी भूमिका बंजारा धर्मगुरू आणि महंतांनी मांडली. पोहरादेवी इथे सेवालाल जयंती उत्सवादरम्यान समाजाच्या संत महंतांनी राठोड यांना पाठिंबा दिला आहे.
पूजाच्या वडिलांची प्रतिक्रिया
या आत्महत्याप्रकरणात पूजाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या आत्महत्येत कुणाचाही सहभाग नाही. कर्जाच्या ओझ्यामुळे तिने हे पाऊल उचलले असू शकते.” असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. याचा आधार घेत बंजारा समाजाकडूनही या प्रकरणावर पडदा टाकण्याची मागणी होत आहे. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत, त्यांची बदनामी बंद करावी, असे महंतांकडून सांगण्यात आले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला