पूजा चव्हाण, मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालात छेडछाड होण्याची शक्यता – आशिष शेलार

Pooja Chavan - Mansukh Hiren - Ashish Shelar

मुंबई :- पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप्स सांताक्रूझ येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या आहेत, त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय? तसेच मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज केली.

आमदार आशिष शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारची (Thackeray Government) हेराफेरी अजूनही सुरूच आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जात आहे. पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लिप्स ज्या सांताक्रूझ येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड सुरू आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे.

वाझे प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. नाना पटोले (Nana Patole) आणि सचिन सावंत यांनीच कार घेण्यासाटी वाझेंना मदत केल्याची माहिती पुढे येत आहे. आपल्याकडे चौकशीचा अंगुली निर्देश होऊ नये म्हणून या दोन्ही नेत्यांकडून बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. याची तपास यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

तसेच मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसे शवविच्छेदन करतानाचे रेकॉर्डिंग पोलिसांना पूर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्येसुद्धा छेडछाड केली जाते आहे की काय ? अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी होण्याची गरज आहे, असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत सापडलेल्या नोटा तसेच पैसे मोजण्याचे मशीन हाच का तो आघाडी सरकारचा “किमान समान कार्यक्रम” आहे का? असा टोलाही आमदार आशिष शेलार यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : टीआरपी प्रकरणातही ‘त्यांनी’ खंडणी वसूल केली होती का? आशिष शेलार यांचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER