पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पहिला खटला दाखल

Pooja Chavan

पुणे : सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पहिला खटला दाखल झाला आहे. पुणे लष्कर कोर्टात लीगल जस्टीस सोसायटी तर्फे अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी हा खटला दाखल केला आहे. यापूर्वी पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल न झाल्याने ठोंबरे यांच्या शिष्टमंडळाने न्यायालयात धाव घेतली. आज या खटल्यावर युक्तीवादही झाला, ५ मार्चला पुणे न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा याकरिता फिर्यादी अॅड. भक्ती पांढरे यांच्या नावाने हा अर्ज दाखल करण्यात आला होता.

तक्रार दाखल

याच प्रकरणात भाजपाने (BJP) शिवसेना (Shiv Sena) नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पहिली तक्रार भाजपानेच केली आहे. भाजपाचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची सून, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी काल वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. भाजपा युवा मोर्चाने काल पुण्यात आंदोलन करुन संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER