पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड ‘या’ ठिकाणी मांडणार आपली बाजू

Sanjay Rathod - Pooja Chavan

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) या युवतीच्या आत्महत्या प्रकरणात संशयित ठरलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) पूजाच्या आत्महत्येच्या दिवसापासून, म्हणजे ८ दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ आहेत. ते गुरुवारी (१८ फेब्रुवारीला) जाहीरपणे बोलतील असे त्यांच्याशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

राठोड वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी येथील बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांच्या मंदिरात राठोड लोकांच्या समोर येतील. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. धर्मगुरूंच्या साक्षीने राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सूत्रांनी सांगितले.

समाजाच्या संत महंतांचा राठोड यांना पाठिंबा

पूजा चव्हाण ही आमच्या समाजाची एक होतकरु तरुणी होती. तिची आत्महत्या दुर्दैवी आहे. मात्र, या आत्महत्येच्या आडून आमच्या समाजाच्या नेत्याची राजकीय कारकिर्द संपवण्याचं कटकारस्थान विरोधकांकडून केलं जात असल्याचा आरोप बंजारा समाजाच्या महंतांकडून करण्यात आला आहे. पूजा चव्हाणच्या निमित्ताने मीडिया ट्रायल केली जात आहे, यामुळं बंजारा समाजाची मोठी बदनामी सुरु आहे. आम्ही पूजाच्या कुटुंबाच्या दु:खातही सहभागी आहोत आणि संजय राठोडांच्या पाठिशीही ठामपणे उभे आहोत असं या महंतांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER