पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड ‘नॉट रिचेबल’

Sanjay Rathid-Pooja Chavan

मुंबई :- पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी ऑडिओ क्लीप्स उघड झाल्यानंतर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्हीडीओ ट्विट करुन संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, या सगळ्या गदारोळानंतरही संजय राठोड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमे संजय राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र, संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ आहे.

सरकारवर दबाव वाढला

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारवर दबाव वाढतो आहे. चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड हेच पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आतापर्यंत दबक्या आवाजात संजय राठोड यांचे घेतले जाणारे नाव आता चर्चेत आले आहे. त्यामुळे संजय राठोड प्रकरणी ठाकरे सरकारवर दबाव वाढतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी पण वाचा : पूजा चव्हाण आत्महत्या : चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर केला आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER