पूजा चव्हाण आत्महत्या : ‘त्या’ मंत्र्यासोबत तिचे फोटो! उद्धव ठाकरे, शरद पवार गप्पा का?”

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असेलेले व लपून बसेलले राज्य सरकारमधील एक मंत्री आज १५ दिवसानंतर वाजत-गाजत प्रकट झाले. त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष व गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली. आज एका वृत वाहिनीवर त्या मंत्र्यांचे आत्महत्या केलेल्या तरुणी सोबतचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत, मग अद्यापही या मंत्र्यांविरुध्द ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही असा प्रश्न भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला.

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून संशयाच्या भोवऱ्यात असणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवीत दर्शनासाठी आले होते. राठोड यांच्या पत्रकार परिषदेनंतर नाव न घेताच चंद्रकांत पाटील यांनी राठोड यांच्यावरुन ठाकरे सरकारवर टीका केली. त्या मंत्र्यांच्या विरोधात एवढे पुरावे उघड झाल्यानंतर अजून काय सिद्ध होणे बाकी आहे? राज्य सरकार अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका का घेते आहे? त्या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही आहे?, असे प्रश्न पाटील यांनी विचारले आहेत.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का ?

सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा ठाकरे सरकारने ओलांडली आहे, अशी टीका करताना पाटील यांनी प्रश्न केला – या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत?

महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून अपेक्षित असताना ते त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका आरोपीला वाचवत आहेत, असा आरोप करून पाटील म्हणालेत, जोपर्यंत त्या तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER