पूजा चव्हाण आत्महत्या : नातेवाईकांची तक्रार नाही, इतरांनी चिंता करायची गरज नाही ! – वडेट्टीवारांचा बचाव

Vijay Vadettiwar

मुंबई : पूजा चव्हाण (२२) या तरुणीचे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यात गाजते आहे. या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचा बचाव करताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणालेत, ज्या घरातील किंवा कुटुंबातील व्यक्ती आत्महत्या करते त्या घरातील व्यक्तीला चिंता असते; इतरांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही!

या प्रकरणात मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचे नाव आल्याने महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. सरकारमधले नेते वेगवेगळे तर्क देऊन राठोड यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. परळीच्या पूजा चव्हाणने गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली. भाजपाने हे प्रकरण लावून धरले आहे.

या प्रकरणी विजय वडेट्टीवार म्हणालेत, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तिच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी तक्रार करायला हवी. त्यानंतर तिचे शोषण झाले की नाही? नेमके काय झाले? याचा तपास पोलिस करू शकतात. ज्या घरातील व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्ती आत्महत्या करते. त्या घरातील व्यक्तीला चिंता असते. इतरांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER