पूजा चव्हाण आत्महत्या : राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल

मुंबई : राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली. याबाबतच पत्रक काढून माहिती दिली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा (Rekha Sharma) यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करावी. या चौकशीचा अहवाल सादर करावा, असे म्हटले आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. मंत्री संजय राठोड हे या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आले होते. याप्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत दखल घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER