
मुंबई : राज्यात सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणालेत, पूजा चव्हाणची हत्या नाही तो पूर्णपणे आत्महत्येचा प्रकार आहे.
या प्रकरणात विदर्भातील शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आहे. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले.
मुंडे म्हणालेत, या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असल्या तरी त्यावर आता बोलणे योग्य ठरणार नाही. पोलीस चौकशी करत आहेत. चौकशीत जे सत्य आहे ते समोर येईलच. एकदा सगळं काही स्पष्ट झालं की त्यावर अधिक बोलता येईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला