पूजा चव्हाण आत्महत्या : मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना दिली नाही भेटीसाठी वेळ

Sanjay Raut - Sanjay Rathod

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) (२२) या युवतीच्या आत्महत्याप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याबाबत ‘मातोश्री’ने सावध भूमिका घेतली आहे. या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली होती; पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अजून राठोड (Sanjay Rathod) यांना भेटण्यासाठी वेळ दिली नाही.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काल या प्रकरणात सरळ संजय राठोड यांचे नाव घेतल्यानंतर भाजपाचे नेते या प्रकरणी आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आणि आज या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? तपासात काय तथ्य आहे? यात राठोड यांचा कितपत सहभाग आहे? व्हायरल क्लिप किती सत्य आहेत? याबाबत माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी, असे सूत्रांनी सांगितले.

आज सकाळीच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाचा अहवाल सादर केल्याचे समजते. या प्रकरणी शिवसेना नेत्यांना मीडियाला प्रतिक्रिया देऊ नका, अशी तंबी शिवसेनेकडून देण्यात आल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER