
मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना धमकीचे फोन येत आहेत. याबाबत चित्रा वाघ यांनी ट्विट केले व धमक्या देणाऱ्यांना – धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही. त्यामुळे उगाच मला फोन करून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो, असे सुनावले.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात राठोड यांच्या नावाची उघड चर्चा सुरू झाली. यामुळे चित्रा वाघ यांना धमकीचे फोन येत आहेत.
“राजसत्तेकडे प्रचंड ताकद असते. सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होत आहेत.” असेही ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
“राजसत्ता पाठीशी असल्यानेच तर कर असली तरी डर कशाला? ही मानसिकता बळावली आहे. राजदंडाचे अभय मिळाले आणि सामाजिक न्याय अबाधित राहील. पूजा चव्हाणला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, तिच्यावर अत्याचार केले, त्यालाही कदाचित असंच अभय मिळेल?” असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवर केला.
धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो
जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं👊@BJP4Maharashtra @MumbaiPolice @MahaPolice
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 14, 2021
दिवसभरात
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आज वेगळा खुलासा झाला. पूजाने आत्महत्या केली नाही, ती चक्कर येऊन पडली, असा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी दिल्याची माहिती आहे. तिच्या रूममध्ये वाईनच्या वाटल्या सापडल्याचीही माहिती आहे. वानवडी पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला. या जबाबानुसार पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यसत्तेकडे प्रचंड ताकद असते सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही
मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत (१/२)— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 14, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला