पूजा चव्हाण आत्महत्या : चित्रा वाघ घेणार राज्यपालांची भेट

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Sucide case) प्रकरणात संशयित शिवसेनेचे (Shivsena) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर गेल्या आठवड्याभरापासून आरोप करण्यात येत आहेत. संजय राठोड मात्र घटनेच्या दिवसापासून ‘नॉट रिचेबल’ आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांना पोलीसासमोर हजर करा, अशी मागणी करण्यासाठी भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आज राज्यपालांना भेटणार आहेत.

याप्रकरणाचा तपास सुरु आहेत. मात्र पोलिसांकडून तपासात उशीर होतो आहे, असा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याबाबत चित्रा वाघ आज दुपारी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत. चित्र वाघ यांनी ट्विट केले – पूजा चव्हाण प्रकरणात संदिग्ध भूमिका संशयीत मुख्य आरोपी मंत्री संजय राठोड अद्याप बेपत्ता, या संदर्भात आज दुपारी ३:३० वा.मा.पोलिस महासंचालक यांची तर संध्या.४.४५ वा.महामहीम राज्यपाल यांची राजभवन येथे भेट घेत आहे. असे म्हंटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER