पूजा चव्हाण आत्महत्या : चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर केला आरोप

Chitra Wagh-Sanjay Rathod

मुंबई :- राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणात भाजपाच्या नेत्या चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले असून राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी केली.

या प्रकरणात पहिल्यांदाच भाजपाने संजय राठोड यांचे नाव घेतले आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी एक व्हीडिओ ट्विट केला. त्यांनी संजय राठोड यांच्यावर संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, असे म्हटले.

चित्रा वाघ यांचा व्हीडीओ
पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसात आपल्यासमोर आले आहेत. जवळपास दहा- अकरा ११ ऑडिओ क्लिप, फोटो समोर आलं आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर, तिचा दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, असे मंत्री अरुण राठोड या माणसाला सांगत आहेत, हे आपण ऐकले.

पोलीस याबाबत काहीच स्पष्ट सांगत नाहीत. पूजा राठोड हिच्या परिवारावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून, ‘सुमोटो’ अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. हे फोटो, ऑडिओ क्लिप्स. गेल्या दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे.

भाषणांमध्ये महिलांची सुरक्षांबद्दल बोलणे, घोषणा करणे सोपे असते. मला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचे आहे, कसली वाट बघता? एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघता? ताबडतोब कारवाई करा, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER