पूजा चव्हाण आत्महत्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया …

Sanjay Rathore-CM Uddhav Thackeray

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan )आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackertay)यांची पहिली प्रतिक्रिया आली. या प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या संदर्भात विरोधकांवर टीका करताना ठाकरे म्हणालेत, गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत; तसे होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडू. ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती केली जाईल.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करा, अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यामुले शिवसेनेवर दबाव वाढला आहे.

प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर ‘टॅग’ करण्यात आले होते व याप्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी याबाबत दखल घेतली आहे. पोलिसांकडे या प्रकणाचा चौकशी अहवाल मागितला आहे.