पुजा चव्हाण प्रकरण : अखेर संजय राठोडांचा राजीनामा!

Sanjay Rathore

मुंबई :- पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणामुळे वादात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. टीव्ही ९ ने हे वृत्त दिले आहे.

तर, राणे पुत्रांनी पुन्हा शिवसेनेवर प्रहार करत संजय राठोडांनी राजीनामा दिला आता त्यांच्यावर कडक कारवाई करण्या यावी असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER