
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणी शिवसेनेचे नेते व मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणात पूजाच्या कुटुंबियांकडून थंड प्रतिक्रिया येत आहेत. यावर संताप व्यक्त करत पूजाची चूलत आजी शांताबाई राठोड (Shantabai Chavan) यांनी आरोप केला की, प्रकरण दडपण्यासाठी पूजाच्या आई – वडिलांनी संजय राठोड यांच्याकडून ५ कोटी रुपये घेतले.
शांता राठोड यांनी याबाबत व्हीडीओ शेअर केला आहे. रविवारी पूजाचे आई वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी संजय राठोड यांनी त्यांना ५ कोटी रुपये दिले आहेत. पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप शांता राठोड यांनी केला.
त्या म्हणालात, पूजाला न्याय मिळावा म्हणून मी पहिल्या दिवशीपासून लढा देते आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संजय राठोड यांच्याकडून त्यांनी ५ कोटी रुपये घेतले आहेत. घरातच त्यांनी पैसे पुरून ठेवले आहेत. त्यांच्या घरात जावया-जावयांमध्ये भांडण सुरू आहेत. पूजाचे आई-वडील हे पैशापोटी बोलत आहेत, मुख्यमंत्र्यांनी पूजाला योग्य न्याय द्यावा.
दरम्यान, पूजा चव्हाणचे आई-वडील मला भेटले त्यांनी मला एक पत्र दिले, असे मुख्यमंत्र्यांनी काल पत्रपरिषदेत सांगितले. पत्रात ते म्हणतात – … आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री. संजय राठोड यांच्या राजीनामाची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. … याचे राजकारण करून श्री. संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नका. … श्री. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचले आहेत. फक्त संशयावरून त्यांचाही बळी घेऊ नये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला