पूजा चव्हाण प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आता खुद्द पोलीस महासंचालक मैदानात

Hemant Nagarale-CM Uddhav Thackeray-Pooja Chavan

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण (Pooja Chavan,Sucide case) रोज नवे वळण घेत आहे. या प्रकरणात आता खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagarale) पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाची माहिती घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यात येण्याआधी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता हेमंत नगराळे पुण्यातल्या घटनास्थळी जाऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा संपूर्ण तपास पुणे पोलीस करत आहेत. त्यांच्याकडून नगराळे या प्रकरणाची सखोल माहिती घेतील. तर दुसरीकडे, पुणे पोलिसांचं पथकदेखील यवतमाळला गेलं आहे. शासकीय पातळीवरूनदेखील या प्रकरणाच्या चौकशीसाठी वारंवार विचारणा होत असल्याने पुणे पोलीस वेगाने सूत्रे हलवत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER