हा तर बेशरमपणाचा कळस, राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर भाजपा संतप्त

Atul Bhatkhalkar-Sanjay Rathore

मुंबई : पूजा चव्हाण (२२) या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी संशयित असलेले शिवसेनेचे (Shivsena) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) आज बंजारा समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी येथे जनतेसमोर आले त्यावेळी त्यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. यावर भाजपाने (BJP) प्रतिक्रिया दिली – निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे संजय राठोड यांच्या वक्तव्यावरून दिसून येत होते. संजय राठोड यांची आजची अवस्था म्हणजे सामना चित्रपटातल्या भेदरलेल्या सरपंचसारखी झाली आहे.

भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणालेत, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड सुमारे १५ दिवस अज्ञातवासात होते. त्यांनी आज सहकुटुंब पोहरादेवीचे दर्शन घेतले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावलेत.

अटक करा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भातखळकर म्हणालेत, निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन दिसून येत होते. त्यांनी एकाही प्रश्नचे उत्तर दिले नाही. फक्त समाजाच्या नावावर भावनिक बोलून निघून गेले. ऑडिओ क्लिपमधल्या आवाजावर ते बोललेले नाहीत. आई-बाबांचे नाव घेऊन निघून गेले. संजय राठोड यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER