राजकारण, पक्षपात आम्ही करत नाही; फेसबूकचे स्पष्टीकरण

Facebook

न्युयॉर्क :- फेसबूक (Facebook) भारतातील (India) भाजप (BJP) पक्षाची बाजू घेतो. भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांबाबत फेसबूक नरमाईची भूमिका घेतो. असा आरोप अमेरिकेच्या वॉलस्ट्रिट जनरल वृत्तपत्रातून करण्यात आला होता. त्या आरोपावर फेसबूकने स्पष्टीकरण दिले असून फेसबूक राजकारण, पक्षपात करत नाही. अशा सर्व बाबींपा,ून लांब राहून फेसबूक कंपनी आपले धोरण लागू करते असे म्हटले आहे.

खरेतर फेसबूक अशा वादग्रस्त मजकुरापासून नेहमीच सावधगिरी बाळगते. द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार भडकवणा-या कंटेंटवर प्रतिबंध घालण्यात येतात. तसेच फेसबूकचे अनेक बाबींवर काम चालले आहे. अशा मजकूरावर त्वरीत प्रतिबंध घालण्याबाबत कारवाई होईल असे धोरण राबवणार असल्याचे फेसबूकने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एका राजकीय तक्रारीवर फेसबूकच्या प्रवक्त्याने हे उत्तर दिले आहे. प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका अहवालात फेसबुकवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फेसबुकने भारतातील भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक पोस्टवर कारवाई केली नाही, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी फेसबुक इंडियाच्या धोरण विभाग प्रमुख अनखी दास यांना यासाठी जबाबदार धरण्यात आलं आहे.

दरम्यान, यूझर्सचा विचार करता भारत हे फेसबुकसाठी सर्वात मोठं मार्केट आहे. भारतात फेसबुकचे सर्वाधिक 346 मिलियन यूझर्स आहेत. त्यामुळेच फेसबुकने भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण पोस्टवर कारवाई करणं टाळलं, असा आरोप होत आहे. अनखी दास यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावरील कारवाई टाळून पक्षपातीपणा केल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER