राजकारण तापले ! शिवसेनेतर्फे झळकले #wesupportSanjayRaut चे बॅनर

#wesupportSanjayRaut

मुंबई : खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना EDने एक जुन्या आर्थिक व्यवहारा प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज्यात वादंग पेटले आहे . यापार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी आपल्या जुन्या स्टाईलमध्ये आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईतील ED कार्यालय, भाजपच्या कार्यालयाबाहेर (BJP Office Mumbai) होर्डिंग ठोकल्यानंतर आता डोंबिवलीत शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत.

खासदार राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष भाजप सडकून टीका केली होती. ED च्या चौकशीवर देखील त्यांनी सणसणीत टीका केली. त्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून डोंबिवली शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर खासदार राऊत यांनी केलेली विधाने लिहिण्यात आली आहेत.

दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये केडीएमसी आणि इतर महापालिका निवडणूक असल्यानं हाच मुद्दा घेऊन शिवसेना आक्रमक होऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER