मृतांच्या नावाने राजकारण करणे काँग्रेसच्या गिधाडांकडून शिकावे; आरोग्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोमणा

Maharashtra Today

दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी( Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर करोनासंदर्भातील आकडेवारीवरुन केलेल्या टीकेला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन(Dr. Harsh Vardhan) यांनी सणसणीत उत्तर दिले. राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यू यॉर्कवर जास्त विश्वास आहे! असे म्हणून काँग्रेस मेलेल्या व्यक्तींच्या नावाने राजकारण करते, असा आरोप केला.

हर्ष वर्धन यांनी राहुल गांधींच्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसवर अतिशय कठोर टीका केली. ट्विट – मृतांच्या नावाने राजकारण करने काँग्रेसची पद्धत आहे. झाडांवरील गिधाड सध्या दिसेनाशी झाली असली तरी त्यांच्यातील ऊर्जा मिमीनीवरील गिधडांमध्ये आल्यासारखे वाटत आहे. राहुल गांधींना दिल्लीपेक्षा न्यू यॉर्कवर अधिक विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणे हे जमिनीवरील ‘या’ गिधडांकडून शिकाव!

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, राहुल गांधींनी अमेरिकेतील न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला देत आकडे खोटं बोलत नाहीत पण भारत सरकार बोलते अशी टीका केली होती. न्यू यॉर्कमटाइम्सने भारत सरकार सांगत असलेले करोनाचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता.

आकडेवारी

सोमवारी जवळजवळ ४० दिवसांनंतर दैनंदिन करोना रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली आल्यानंतर मंगळवारी या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात करोनाचे २ लाख ८ हजार ९२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९५ हजार ९५५ करोना रुग्ण मंगळवारी करोनामधून बरे झाले आहेत. सध्या उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २५ लाखांच्याही खाली आली आहे. मात्र त्याच वेळेस करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पुन्हा वाढल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये करोनामुळे ४ हजार १५७ जणांचा मृत्यू झालाय. आरोग्यमंत्रालयाने बुधवारी यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी ही १.१५ टक्के आहे, असे केंद्राचे म्हणणे आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button