कोवॅक्सीनवरून महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये राजकारण; डॉ. हर्षवर्धन यांचा आरोप

Maharashtra Today

मुंबई : महाराष्ट्रात(Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात सुरू असलेली लसीकरण मोहीम मंदावल्याचे दिसून आहे. तसेच महाराष्ट्र, छत्तीसगढसारख्या राज्यांमधून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याचा आरोपही करण्यात आला. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “आम्ही राज्य स्तरावर लसींचा पुरवठा करत आहेत. त्या लसी सेंटर्सपर्यंत पोहचवणे हे त्या राज्याचे काम आहे. वितरणाबाबत कोणतेही राजकारण केले नाही.” असे स्पष्टीकरण डॉ. हर्षवर्धन यांनी दिले .

राज्यांना लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याच्या आरोपांवर डॉ. हर्षवर्धन यांना सवाल करण्यात आला. “आम्ही राज्यांच्या पातळीवर लसींचा पुरवठा करत आहोत. त्या लसी लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. जर कोणत्याही राज्याने योग्य प्रकारे तयारी केली नाही आणि त्यामुळे लसींचे डोस वाया जात असतील, तर हे राज्य सरकारचे अपयश आहे. लसींच्या वितरणाबाबत कोणतेही राजकारण केले जात नाही,” असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

>महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये राजकारण

“कोवॅक्सीनबाबत(Covaxin) महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये राजकारण होत होते. छत्तीसगढला जानेवारी महिन्यातच लसींचा पुरवठा केला. परंतु त्यांनी ३ महिने लसीकरणाला सुरूवात केली नाही. दोन वेळा त्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले. ३ महिने राजकारण सुरू होते. लोकांना लसीकरण केले नाही. मार्च अखेरिस त्यांनी लसीकरणाला सुरूवात केली.” असे डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद केले.

सर्वाधिक लसी महाराष्ट्राला

सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान ही ३ अशी राज्ये आहेत ज्यांना १ कोटी पेक्षा अधिक लसींच्या डोसचा पुरवठा करण्यात आला. लसीकरणाचा राज्यांच्या लोकसंख्येशी काही संबंध नाही. ते अनेक गोष्टींवर अवलंबून असते . जर तुम्ही लोकसंख्येच्या दृष्टीने पहिले, तर उत्तर प्रदेशला सर्वाधिक लसी मिळायला हव्या होत्या. परंतु तसे झाले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरासरी लसीकरण अमेरिकेपेक्षाही अधिक

“लसीकरण मोहीम ही एक डायनॅमिक प्रोसेस आहे. ती नंबर्सच्या आधारावर पाहता येणार नाही. आपल्याकडे देशात दिवसाला होणारे लसीकरण हे अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. आपण सर्वात जलदगतीने आणि सर्वात कमी वेळा ९ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे.” अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button