शिवसेनेसाठी राजकारण निवडणुकांपुरते मर्यादित – आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray

मुंबई : शिवसेनेसाठी (Shiv Sena) राजकारण निवडणुकांपुरते मर्यादित असते. शिवसेना आणि पक्षाचे नेते कधीही इतरांसारखे लोककल्याणाच्या कामांमध्ये राजकारण करत नाहीत, असा टोमणा महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विरोधी पक्षांना लगावला. आज कल्याणच्या पत्री पुलावर गर्डर टाकण्यात आले. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे आणि काही नेते उपस्थित होते.

ते म्हणाले – शिवसेनेसाठी राजकारण हे नेहमी निवडणुकांपुरते मर्यादित असते. निवडणुका संपल्या की सारे शिवसैनिक आपापल्या विभागातील लोककल्याणाच्या कामांना सुरुवात करतात. पण काही लोक मात्र मुद्दाम अशा कामांमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतात.

पत्री पुलाच्या कामात अनेक अडथळे आले. अखेर आज पुलावर गर्डर टाकणे विनाविघ्न पार पडले. महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या उन्नतीसाठी इतर लोकोपयोगी कामांचीही लवकरच सुरुवात करेल. समृद्धी महामार्ग किंवा मुंबई-नागपूर एक्स्प्रेस मार्गाची कामे पुढील वर्षापर्यंतच पूर्ण करण्यात येतील, असे ते म्हणाले.

“प्रत्येक महिन्यात आम्ही विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेत असतो. ट्रान्स-हार्बर लिंक, कोस्टल रोड, वरळी-शिवडी यांना जोडणारा मार्ग अशा विविध प्रकल्पांबाबत सरकार कार्यरत आहे. कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पत्री पूल ही नववर्षाची भेट असणार आहे. ” अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER