राजस्थानमध्ये मध्यरात्री राजकीय खलबतं, कॉंंग्रेसचं सरकार पडणार?

गेहलोत आणि पायलट यांच्यातील सत्तासंघर्ष विकोपाला

Ashok Gehlot - Rahul Gandhi - Sachin Pilot

जयपूर :- एकीकडे कोरोना संकट तर, दुसरीकडे राजस्थानमधील राजकीय घडमोडींनाही वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी बंडाचा झेंडा हाती घेतला. रविवारी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली.

विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे नी यावेळी सांगितलं की, “१०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे”.

सचिन पायलट यांच्या मनात काय चाललं आहे. किती लोकांना घेऊन ते कॉंग्रेसच्या बाहेर पडणार या प्रश्नांची उत्तर अद्याप नाहीत. मात्र, सचिन पायलटच्या मागे मोठा जनाधार आणि नेत्यांचा गराडा आहे. त्यामुळे पायलटच्या बंडामुळे राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER