राष्ट्रवादीवर राजकीय संक्रांत! मुंडेंवरील बलात्काराचे आरोप ताजे असतानाच मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी नोटीस

Nawab Malik & NCB

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे झालेले आरोप ताजे असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकापाठोपाठ एक अशा दोन प्रकरणात अडकल्याने राष्ट्रवादीवर राजकीय संक्रात ओढावल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडेच राज्याचे गृहखाते असल्याने या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काय कारवाई करते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे.

ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावल्याचं सांगितलं जात आहे. नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER