राजकीय पक्ष दुर्गापूजेसंबंधी अफवा पसरवत आहेत- ममता बॅनर्जी

Durga Puja - Mamata Banerjee

कोलकाता : “राजकीय पक्ष दुर्गापूजेसंबंधी अफवा पसरवत आहेत. यासंबंधी अद्याप आपण कोणतीही बैठक घेतलेली नाही. पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने या वर्षी दुर्गापूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं सिद्ध करून दाखवा, मी लोकांसमोर १०० उठाबशा काढेन.” असं ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी म्हटलं आहे. तसेच, राजकीय पक्ष जाणूनबुजून दुर्गापूजेसंबंधी अफवा पसरवत असल्याचा आरोपदेखील ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या, “काही बनावट आयटी पेजेस दुर्गापूजेसंबंधी चुकीची माहिती पसरवत आहेत. जातीय सलोखा बिघडवण्यासाठीच हे सर्व केलं जात आहे. ज्यांनी कधीही दुर्गा किंवा हनुमानाची पूजा केलेली नाही ते लोक पूजेबद्दल बोलत आहेत. ” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

त्या पोलीस दिन समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या.

तसेच, अशी खोटी अफवा पसरवणा-यांना पकडून त्यांना कान पकडून उठाबशा काढायला लावा, असं मी पोलिसांना सांगितलं आहे, असे ममता बॅनर्जीं म्हणाल्या.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर असलेली बंधनं २० सप्टेंबरपर्यंत कायम असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER